नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या रोजच्या आहारात (Turmeric crop) हळदीचे खूप अनन्य महत्व आहे आणि हळद भारतीय शेतीमध्ये एक अत्यंत महत्त्वाचे पीक आहे. तिचा उपयोग अन्न, औषधी, सौंदर्यप्रसाधनांमध्ये तसेच औद्योगिक उत्पादनांमध्येही केला जातो. पण हळदीवर विविध प्रकारच्या कीड आणि रोगांचा परिणाम होतो. यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होतो आणि शेतकऱ्यांना त्याचे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. हळदीवरील कीड नियंत्रणासाठी, शेतकऱ्यांना वेळोवेळी प्रभावी उपाय करणे आवश्यक आहे. यामध्ये रासायनिक उपायांची भूमिका महत्त्वाची ठरते. यासाठी आम्ही हळदीवरील प्रमुख कीड आणि त्या कीडांच्या नियंत्रणासाठी रासायनिक उपायांची सविस्तर माहिती आज आपण या लेखात बघणार आहोत.

(Turmeric crop) हळदीवरील प्रमुख कीड व त्यांचे लक्षणे:
1. प्रियंज माशी (Shoot Borer)
शेतकरी मित्रांनो प्रियंज माशी हळदीच्या खोडावर छिद्र पाडून त्यात अंडी घालते. (Turmeric crop) या अंडांपासून बाहेर आलेले सुरवंट हळदीच्या खोडावर खाणे सुरू करतात. यामुळे हळदीच्या उत्पादनात कमी होणारी गुणवत्ता दिसून येते. म्हणून या माशी च निवारण करण खूप महत्वच आहे.आम्ही या माशी चे काही लक्षणे हे पुढील प्रमाणे :शेतकरी मित्रांनो या माशी ने हळदीच्या खोडावर छिद्र दिसतात आणि हळदीच्या खोडातील पारदर्शकता वाढते आणि खोड कमजोर होतो.या माशी वर लवकर निवारण कराव. आणि एक लक्षण म्हणजे हळदीच्या पानांवर वाळवट दिसतो.शेतकरी मित्रांनो प्रियंज माशी मुळे उत्पादन कमी होऊ सकते या माशी वर योग्य तो उपाय करणे खूप महत्वचे आहे या वर काही उपाय आम्ही खाली दिले आहे.
2. स्केल कीड (Rhizome Scale)
स्केल कीड (Turmeric crop) हळदीच्या मुळावर छिद्र करतो आणि तेथे लहान कीटक तयार होतात. यामुळे हळदीच्या मुळांचा विकास खूप धीमा होतो आणि उत्पादन कमी होऊ शकते.याचे लक्षणे आपण बघू स्केल कीडा मुळे हळदीच्या मुळावर तपकिरी किंवा पांढरे डाग दिसतात. हे या किडयाच लक्षण आहे आणि खाली जमिनीत मुळांची मऊ आणि झाकलेली अवस्था दिसते. याने हळदी ची वाढ थांबते स्केल कीड या किडया वर उपाय करणे खूप गरजेचे आहे. या किडया मुळे हळदीच्या पिकांची वाढ खुंटते.म्हणून या किडया चे लक्षणे लक्षात घेऊन योग्य ते फवारणी करावी आम्ही कोणती फवारणी करावी या बद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे.
3. गोडा माशी (Whitefly)
शेतकरी मित्रांनो (Turmeric crop) ह्या माशी वर लवकर आणि योग्य उपाय करनने खूप महत्वचे आहे कारण गोडा माशी हळदीच्या पानांवर वाढत असते. आणि माशी पानावर शोषण करतात, ज्यामुळे पानांचा रंग पिवळा पडतो आणि उत्पादन कमी होते.या माशी चे लक्षणे पांढरट माशी पानांवर दिसते.व पानांचा रंग पिवळा पडतो.आणि पानांवर गुळगुळीत होण्याचे लक्षण दिसते.शेतकरी मित्रांनो या गोंडा माशी वर योग्य तो उपाय करावा काही उपाय आम्ही खाली दिले आहे.
4. पाकळी माशी (Leaf Roller)
शेतकरी मित्रांनो पाकळी माशी हळदीच्या पानांवर खाणारे सुरवंट बनवते. यामुळे पानांचा आकार आणि स्वरूप बिघडते. या माशी ओळख कशी करावी? अळी (caterpillar) ही पाने गुंडाळून त्यातच राहते.या अळ्या हिरवट किंवा पिवळसर रंगाच्या असतात.आणि पाने गुंडाळून आतील भाग खाऊन टाकतात, त्यामुळे प्रकाश संश्लेषण थांबतं.या माशी चे लक्षण (Turmeric crop) हळदीच्या पानांवर खाणारे सुरवंट असतात.व पानांचे गुळगुळीत होणे आणि छिद्र पडणे.या मुळे हळद उत्पादनावरपरिणाम होऊ सकतो यावर योग्य तो उपाय करावा
रासायनिक उपाय – हळदीवरील कीड नियंत्रणासाठी:
प्रियंज माशी (Shoot Borer) साठी रासायनिक उपाय
प्रियंज माशीला नष्ट करण्यासाठी क्लोरपायरीफॉस 20% EC हा रासायनिक उपाय अत्यंत प्रभावी आहे. (Turmeric crop) त्याचे वापराचे प्रमाण आणि वेळ तपासून योग्य फवारणी केली तर प्रियंज माशी संपून त्या पासून होणाऱ्या नुकसान थांबते आणि उत्तपन्ना मध्ये घट होत नाही. क्लोरपायरीफॉस 20% EC उपाय कसा आणि केव्हा करावा हे खाली दिले आहे.
उपाय:
- क्लोरपायरीफॉस 20% EC – 2.5 मिली/लिटर पाणी
- फवारणी दर 15 दिवसांनी एकदा करा.
- याची फवारणी पिकावर जास्त वाऱ्याच्या वेळी नाही तर सायंकाळी किंवा सकाळी करा.

स्केल कीड (Rhizome Scale) साठी रासायनिक उपाय
शेतकरी मित्रांनो स्केल कीड नष्ट करण्यासाठी डायमेथोएट 30% EC हे प्रभावी रासायनिक उपाय आहेत. (Turmeric crop) या रासायनिक फवारणी हळदीच्या मुळावर करायची आणि फवारणी करताना एक गोष्ट लक्षात घ्या मुळांवर थोडा ओलसर असू द्या आणि मग फवारणी करावी.
उपाय:
- डायमेथोएट 30% EC – 1.7 मिली/लिटर पाणी
- हळदीच्या मुळावर थोड्या ओलसर मातीवर फवारणी करा.
- फवारणी दर 10-12 दिवसांनी एकदा करा.

गोडा माशी (Whitefly) साठी रासायनिक उपाय
शेतकरी मित्रांनो गोडा माशीच्या नियंत्रणासाठी असिटामिप्रिड 20% SP चा वापर केल्या ने आपणास चांगला रिजल्ट मिळेल असिटामिप्रिड 20% SP याची फवारणी हळदीच्या पानांवर खूप प्रभावी असते.म्हणून गोंडा माशी साठी असिटामिप्रिड 20% SP ची फवारणी करावी.
उपाय:
- असिटामिप्रिड 20% SP – 0.25 ग्रॅम/लिटर पाणी
- पानांवर फवारणी करा, आणि फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करा.
पाकळी माशी (Leaf Roller) साठी रासायनिक उपाय
शेतकरी मित्रांनो पाकळी माशीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सायपरमेथ्रिन 10% EC या रासायनिक उपायाचा वापर प्रभावी आहे. म्हणून पाकळी माशी साठी सायपरमेथ्रिन 10% EC याची फवारणी करावी यामुळे योग्य निवारण होईल शेतकरी मित्रांनो फवारणी करताना योग्य ते काळजी घ्या.
उपाय:
- सायपरमेथ्रिन 10% EC – 1 मिली/लिटर पाणी
- फवारणी दर 7-10 दिवसांनी एकदा करा.
शेतकरी मित्रांनो हे आपण हळदी वर होणारे काही कीड आणि उपाय बघितले आपण जर या हे योग्यरित्या बघून फवारणी केली तर नक्कीच आपण (Turmeric crop) हळदीच्या उतपन्ना मध्ये वाढ करू सकतो. त्या साठी कीड नियंत्रण खूप महत्वच आहे योग्य ते कीड व्यवस्थापन करून आपल्या उतपन्ना मध्ये वाढ करा.
फवारणी करताना शेतकारींनी घ्यायची काळजी :
- फवारणी करताना मास्क, चष्मा आणि हातमोजे वापरणे आवश्यक आहे.
- फवारणी करताना योग्य काळात व वातावरणात करा.
- रासायनिक उपाय वापरण्यापूर्वी पिकाच्या सामान्य स्थितीची तपासणी करा.
- कीड नष्ट करण्यासाठी फवारणीच्या अंतरालावर लक्ष ठेवा.
- हळदीच्या मुळांच्या विकासाची नियमित तपासणी करा.
निष्कर्ष:
हळदीवरील कीड नियंत्रणासाठी रासायनिक उपाय अत्यंत महत्त्वाचे आहेत. योग्य प्रकारे रासायनिक उपायांची निवड केल्यास शेतकऱ्यांना पिकांचे उत्पादन वाढवण्यात मदत होईल. (Turmeric crop) शेतकऱ्यांनी प्रत्येक फवारणी वेळेवर केली पाहिजे आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी योग्य उपाय वापरणे आवश्यक आहे. हळदीचे उत्पादन आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना या उपायांची नियमितपणे माहिती घेत राहणे महत्त्वाचे आहे.
टीप: वरील संपूर्ण माहिती, उपाय हे सर्व आमचा अनुभव आम्ही इथे मांडतोय तरी आपण योग्य तो सल्ला घेऊन हे उपाय करावे.
माहिती कसी वाटली आम्हाला नक्की सांगा
- इतर शेतकऱ्यांपर्यंत माहिती शेअर करा
- कमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारा
- नवीन माहितींसाठी आमच्या फेसबुकवर Agro Marathi ला फॉलो करा
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs):
A1. (Turmeric crop) हळद पिकावर पांढरी माशी (Whitefly), थ्रिप्स (Thrips), पाकळी माशी (Leaf Roller), हळद खवखव (Shoot borer), आणि स्केल कीड (Scale insect) यांचा प्रादुर्भाव होतो.
A2. क्लोरोपायरीफॉस 20% EC (2.5 ml/L) किंवा सायपरमेथ्रिन 10% EC (1 ml/L) या कीटकनाशकांची फवारणी केली तर पाने गुंडाळणाऱ्या अळ्यांचा नाश होतो.
A3. पानांवर लहान तपकिरी गाठीसारखी कीड दिसते. मालॅथियॉन 50% EC (2 ml/L) किंवा बुप्रोफेझिन 25% SC (1.5 ml/L) वापरून नियंत्रण करता येते.
A4. फवारणी करताना मास्क, हातमोजे आणि पूर्ण कपडे वापरावेत. झाडांच्या संपूर्ण भागावर फवारणी होईल याची काळजी घ्या. कधीही अन्न तयार करताना किंवा जेवत असताना फवारणी करू नये
A5. फवारणीची वेळ सकाळी ८-१० वा. किंवा संध्याकाळी ४-६ वा. राखावी. १०–१५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी, कीड वाढीनुसार पुनरावृत्ती करावी.
A7. काही कीटकनाशके एकत्र करता येतात, पण त्यासाठी विस्तृत माहिती व कृषी सल्लागाराचा सल्ला घ्या. चुकीचा मिक्सिंग नुकसानकारक ठरू शकतो
1 thought on “Turmeric crop : हळद पिकातील कीड नियंत्रण 100% Effective”