प्रस्तावना
शेतकरी मित्रांनो शेतजमिनीत जोपर्यंत सेंद्रिय कर्ब, गांडूळ, यांची संख्या भरपूर होती तो पर्यन्त पिकाचे समाधानकारक उत्पादन मिळत होते.शेतकरी मित्रांनो पण जेव्हा पासून रासायनिक शेती पद्धततील रासायनिक खते किडनाशके, रोगनाशके, तणनाशके, यांचा वापर जास्त प्रमाणात करून जमीचे आरोग्य खराब झाले आणि उत्पादन कमी होऊ लागले. शेतकरी मित्रांनो रासायनिक शेती मुळे शेतकरी कर्ज बाजारी झाला कारण महाग असे खते, किडकनाशके. शेतकऱ्यांनी आज कमी खर्च मध्ये बिन कर्जाचे व जास्त उत्पन्न देणारी सेंद्रिय शेती (Organic Farming) कडे वळायला पाहिजे आज आपण कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी शेती म्हणजे सेंद्रिय शेती बद्दल बघणार आहोत.
सेंद्रिय शेतीची म्हणजे काय? (Benefits of Organic Farming)
सेंद्रिय शेती (oraganic farming) म्हणजे एक शेतीची पद्धत आहे त्यामध्ये आपण नैसर्गिक आणि पर्यावरणाला पोशाक शेती पर्यावरणपूरक साधनांचा वापर करून सेंद्रिय शेती केली जाते.शेतकाऱ्यांनो सेंद्रिय शेती मध्ये आपण शेणखत, कंपोस्ट, हिरवळी खत, जीवामृत, लेंडी खत, जोरखते, गांडूळ खत,मळी खत, स्लरी आणि वेगळे वेगळे दशपर्णी अर्क वापर करून कमी खर्चात जास्त उत्पादन घेऊन शेती करू सकतो. शेतकरी मित्रांनो जमिनीत खूप सारे असंख्य जिवाणू आहेत आणि त्यात अशे जिवाणू आहे जे पिकांना अन्नद्रव्य उपलब्ध करून देतात. शेतकरी मित्रांनो यात काही जिवाणू रोग प्रतिबंधक असतात. शेतकरी मित्रांनो आज आपण सेंद्रिय शेती चे 10 महत्वाचे फायदे बघणार आहोत.

1. जमिनीची सुपीकता टिकून राहते : (Increases soil fertility):
शेतकरी मित्रांनो आपण बघतोय आजकाल अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनींची ताकद कमी होत चालली आहे याला कारण आहे रोज वापरली जाणारी रासायनिक खते, कीटकनाशके आणि सतत एकाच पिकांची शेती. यामुळे याचा थेट परिणाम मातीच्या सुपीकतेवर होतो. पण शेतकार्या नी एक लक्षात घ्यायला पाहिजे याला पर्याय आहे ते म्हणजे (Organic Farming) सेंद्रिय शेती.
आपल्याला माहितीच आहे की सेंद्रिय शेतीत आपण रासायनिक खते बाजूला ठेवून, नैसर्गिक खतांचा वापर करतो जसे की शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट, हरित खते, यांसारखी. ही खतं मातीला काही तासांसाठी नाही तर दीर्घकाळासाठी टीवउण ऊर्जा देतात. या मुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते.
उदाहरणार्थ, गांडूळ खत मातीतील सेंद्रिय पदार्थ वाढवते आणि त्यामधील नैसर्गिक जीवाणू आणि पोषक द्रव्यांचे प्रमाण सुधारते. यामुळे झाडांच्या मुळांना योग्य पोषण मिळून ते अधिक बळकट होतात. Organic Farming शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या – माती फक्त काळी किंवा लाल असली म्हणून आपण ते सुपीकता आहे ठरवू शकत नाही तर मातीमध्ये असणारे सेंद्रिय पदार्थ (organic matter) हेच सुपीकतेचे खरे मोजमाप आहे.
सेंद्रिय शेती ही मातीसाठी एक प्रकारची उपचारपद्धती आहे – जशी माणूस थकला की घरच्या जेवणाने बरा होतो, तशीच माती सुद्धा सेंद्रिय खतांनी पुनर्जिवित होते. थोडक्यात सांगायच म्हटल तर सेंद्रिय शेती मुळे मातीचा पोत सुधारतो आणि पोषकद्रव्यांची नैसर्गिक देवाण-घेवाण वाढते आणि महत्वच म्हणजे सुपीकता ५–१० वर्ष टिकते व शेती च उत्पादनाचे प्रमाण आणि गुणवत्ता चांगली राहते. Organic Farming शेतकरी मित्रांनो जर तुम्ही दर हंगामात २–३ वेळा गांडूळ खत वापरत असाल, तर तुमच्या जमिनीला पुन्हा रासायनिक खतांची गरज भासणार नाही.
2. पाण्याची बचत होते (Water is saved):
शेतकरी मित्रांनो दुसरा फायदा म्हणजे पाण्याची बचत आपण सगळेच जाणतो की आज पाणीटंचाई ही (Organic Farming) शेतकऱ्यांसमोरील एक मोठी अडचण आहे. आपण बघतोय काही भागांमध्ये तर हंगाम सुरू व्हायच्या आधीच विहिरी कोरड्या पडतात आणि नद्या आटतात. अशा वेळी जर शेतीच करायची असेल, तर पाण्याचा योग्य वापर करावा लागतो. इथेच सेंद्रिय शेती आपल्याला पूरक आहे.
सेंद्रिय खतांचा वापर केल्यामुळे मातीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण (organic matter) वाढते. हे सेंद्रिय घटक म्हणजे मातीतील खजिनाच काम करते (Organic Farming) कारण ते मातीची ओलसरपणा धरून ठेवण्याची क्षमता वाढवतात. शेकऱ्यांच्या माहिती साठी सांगतो की साधारण रासायनिक शेतीत पाणी झपाट्याने खाली जाऊन वाया जातं. पण सेंद्रिय शेतीत, माती “स्पंज” सारखी वागते पाणी शोषते आणि हळूहळू झाडाला देत राहते.
कोरडवाहू भागात सेंद्रिय शेती केली जाऊ सकते :
शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रात काही भागांत पाऊस कमी होतो, पण जिथे सेंद्रिय शेती केली जाते तिथे कमी पावसातही पीक उभं राहतं – कारण मातीने आधीच ओल धरून ठेवलेली असते. आणि रासायनिक खते अस करू शकत नाही. उदाहरण: जर तुम्ही गांडूळ खत किंवा शेणखत वापरलेली जमीन पाहिली, तर ती उष्णतेमध्येही ओलसर राहते, कारण त्यातल्या सूक्ष्मजीवांच्या हालचाली मातीला जिवंत ठेवतात. हा पण एक फायदा आहे.
तुम्हाला काय फायदा?
शेतकार्याना होणार फायदा म्हणजे सिंचनासाठी लागणारं पाणी २५–४०% पर्यंत कमी लागतं आणि टंचाईच्या काळातही पीक तग धरतं तसेच कमी पाण्यातही जास्त उत्पादन मिळतं व विजेचा वापर कमी होतो (पंप वापर कमी वेळा लागतो) यामुळे आपली वीज कमी लागते आणि तेवढ विजबिल कमी येते.
3. आरोग्यदायी अन्न उत्पादन Healthy Food Production:
शेतकारींनो आजच्या घडीला ग्राहक जेवढे चांगल्या दरात पीक विकायच्या विचारात असतात, तेवढेच ग्राहक आरोग्यदायी अन्नाच्या शोधात आहेत. म्हणून हे एक संधी सुद्धा आहे. आपण बघतोय सध्या गेल्या काही वर्षांत “ऑर्गेनिक फूड” किंवा “विषमुक्त अन्न” यांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. आणि या मागणीमागे एकच कारण आहे ते म्हणजे आरोग्य. (Organic Farming) आणि सेंद्रिय शेती ही अशा प्रकारची शेती आहे जिथे केमिकल्सचा वापर शून्य किंवा अत्यल्प असतो. तसेच कोणतीही रासायनिक खते, कीटकनाशके, किंवा वाढीचे इंजेक्शन्स वापरले जात नाहीत. परिणामी, जे काही उत्पादन होते ते पूर्णपणे नैसर्गिक, विषमुक्त आणि पोषणयुक्त असते.
सेंद्रिय अन्न म्हणजे विषमुक्त अन्न:
Organic Farming आज जे आपण साधारण रासायनिक शेतीत वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांमध्ये अनेक प्रकारचे टॉक्सिक घटक (विषारी रसायने) असतात. हे रसायन झाडांवर फवारल्यावर काही प्रमाणात थेट फळं, भाज्या, धान्य यामध्ये शोषले जातं आणि शेवटी आपल्या पोटात पोहोचतं.
आपण जेव्हा एक चमचा भाज्याचं भाजीपाला खातात, तेव्हा त्यासोबत अर्धा-एक चमचा रसायनसुद्धा आपल्या शरीरात जातं आणि हाच अनेक आजारांचा मुळ मुद्दा आहे. Organic Farming अनेक आजारांना आमंत्रण देते. म्हणून सेंद्रिय शेतीविष मुक्त आहे. आणि सेंद्रिय शेतीत झाडांना नैसर्गिक संरक्षण दिलं जातं. उदा. निंबोळी अर्क, गोमूत्र, लसून-आलं फवारण्या, जैविक कीटकनाशकं, यांचा वापर केल्यामुळे उत्पादन रसायनमुक्त राहतं.
पोषणमूल्य जास्त असतं:
मित्रांनो आज पर्यन्त अनेक संशोधनातून असकाही सिद्ध झालं आहे की सेंद्रिय अन्नामध्ये खालील गोष्टींचं प्रमाण अधिक असतं:
- Vitamin C, Iron, Magnesium, Phosphorus
- Antioxidants – जे शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढवतात
- Omega-3 fatty acids – विशेषतः सेंद्रिय पद्धतीने पाळलेल्या जनावरांच्या दूध, तूपात
हे पोषक घटक अन्नात टिकून राहतात कारण झाडांना नैसर्गिकरीत्या वाढू दिलं जातं रासायनिक वाढीच्या इंजेक्शन्सविना. जेव्हा आपण सेंद्रिय अन्न खायला सुरुवात करतो, Organic Farming तेव्हा आपल्या शरीरात हळूहळू सकारात्मक बदल घडायला लागतात. लहान मुलं, गर्भवती महिला आणि वृद्ध व्यक्तींसाठी सेंद्रिय अन्न हे सर्वोत्तम आणि सुरक्षित पर्याय आहे. कारण त्यामध्ये कोणतीही कृत्रिम रासायनिक रचना नसते, जी दीर्घकालीन दुष्परिणाम देऊ शकते.
4. पर्यावरणास अनुकूल (Beneficial for the environment):
शेतकरी मित्रांनो आज आपल्याला हवामान बदल, जलप्रदूषण, मातीची धूप, आणि जैवविविधतेची हानी या सगळ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. आणि या समस्यांमागे एक मोठं कारण म्हणजे रासायनिक शेतीचा वाढता वापर. Organic Farming पण सेंद्रिय शेती या समस्यांवर स्वस्थ, टिकाऊ आणि नैसर्गिक उपाय देते.
नैसर्गिक पद्धतीचा वापर:
आपल्या माहिती साठी सांगतो की सेंद्रिय शेतीमध्ये खतं, कीटकनाशकं, फवारणीसाठी वापरली जाणारी प्रत्येक गोष्ट नैसर्गिक स्रोतांपासून तयार केली जाते. Organic Farming उदा. शेणखत, गांडूळ खत, निंबोळी अर्क, लसून-आलं फवारण्या, गोमूत्र, कंपोस्ट इ. या गोष्टींचा वापर केल्यामुळे: माती प्रदूषित होत नाही व पाण्यात रसायनं मिसळत नाहीत आणि हवामानाला धोकाही होत नाही. शेतकरी मित्रांनो सेंद्रिय शेतीत मधमाशा, गांडूळ, पक्षी, सूक्ष्मजीव यांचं अस्तित्व जपलं जातं. यामुळे नैसर्गिक अन्नसाखळी आणि परिसंस्थेचा समतोल टिकतो.
हवामान बदलावर नियंत्रण:
रासायनिक शेतीमुळे हरितगृह वायूंचं (GHGs) उत्सर्जन जास्त होतं, जे वातावरण तापवतात. पण सेंद्रिय शेतीत कार्बन मातीमध्येच शोषला जातो तसेच वायू उत्सर्जन कमी राहतं आणि हवामान बदलाचा प्रभाव कमी होतो. Organic Farming हा एक सेंद्रिय शेती चा फायदा आहे.
पाणी वाचते, प्रदूषणही टळतं:
रासायनिक शेतीत वापरली जाणारी फवारणी शेताजवळील विहिरी, ओढे, नद्या यामध्ये मिसळून जलप्रदूषण निर्माण करते. सेंद्रिय शेतीत ही शक्यता राहत नाही. सेंद्रिय शेती म्हणजे फक्त एका हंगामापुरती योजना नाही, तर पिढ्यानपिढ्या टिकणारी पद्धत आहे. ती माती, पाणी, हवा आणि जीवन सगळ्यांचं संतुलन राखते.
5. कमी खर्चात जास्त नफा High Returns with Low Investment :
शेतकरी मित्रांनो Organic Farming सेंद्रिय शेती ही फक्त पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी नसून, तर सेंद्रिय शेती शेतीचा खर्च कमी करून अधिक नफा देणारी पद्धत सुद्धा आहे. हे आपल्याला ऐकायला जरा आश्चर्य वाटू शकतं, पण शेतकाऱ्यांनो हे खर आहे आणि विशेष म्हणजे दीर्घकालीन वेळे साठी सेंद्रिय शेती कमी खर्चात जास्त नफा देणारी शेती आहे.
रासायनिक खते आणि फवारणींचा खर्च वाचतो:
आज कल रासायनिक खते खूप महाग झाली आहे रासायनिक शेतीमध्ये शेतकऱ्यांना प्रत्येक हंगामात रासायनिक खते, कीटकनाशके, फवारणीचे औषधे यावर हजारो रुपये खर्च करावे लागतात. आणि रासायनिक खते,किडकनाशके हे दरवर्षी महाग होतच जातात. पण Organic Farming सेंद्रिय शेतीत हे सर्व खर्च किंवा तर पूर्ण वाचतात किंवा खूप कमी होतात. उदा. गांडूळ खत, शेणखत, कंपोस्ट खत हे आपण स्वतः तयार करु सकतो आज जवळ जवळ सगळ्यां शेतकार्या कडे म्हैस, गाई असे पसु आहे आपण त्यामधून वरील घरच्या घरी तयार करू सकतो. निंबोळी अर्क, गोमूत्र फवारण्या घरच्या घरी तयार करता येतात. त्यामुळे बाहेरून विकत घ्यावं लागत नाही, यामुळे खर्चात मोठी बचत होते.
शेतकरी स्वत: तयार करू सकता :
शेतकरी स्वतःच खतं आणि कीटकनाशकं तयार करू सक्यतो कारण आपल्या कडे सर्व उपलब्ध आहे. यामुळे तो कोणत्याही कंपन्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून रहाव लागत नाही. सेंद्रिय शेती हे केवळ खर्च कमी करत नाही, तर शेतकऱ्याला आत्मनिर्भर बनवतं.
सेंद्रिय उत्पादनांना जास्त दर:
शेतकरी मित्रांनो सेंद्रिय अन्नाला बाजारात प्रिमियम किंमत आहे. ग्राहक विषमुक्त अन्नासाठी जास्त पैसे देण्यास तयार असतात. उदाहरण: सामान्य तांदळाचा दर ₹30–₹40 असतो, तर सेंद्रिय तांदूळ ₹60–₹80 ला विकला जातो. यामुळे उत्पादन कमी असलं तरीही एकूण उत्पन्न जास्त मिळू शकतं.
सबसिडी आणि मार्केट सपोर्ट:
शेतकाऱ्यां साठी आज अनेक राज्य सरकारं, केंद्र सरकार, आणि NGO संस्थांकडून सेंद्रिय शेतीसाठी अनुदान देत असते ते खाली दिले आहे:
- सबसिडी (अनुदान)
- प्रशिक्षण
- सेंद्रिय शेतमाल खरेदी केंद्र
- सेंद्रिय बाजारपेठांमध्ये प्रवेश
Organic Farming अशा योजना उपलब्ध आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक भार आणखी कमी होतो. सेंद्रिय शेतीत जमिनीची सुपीकता वाढत जाते, माती सुधारते, आणि दीर्घकाळ उत्पादनशक्ती टिकते. त्यामुळे हळूहळू उत्पादन खर्च आणखी कमी होतो आणि नफा वाढतो.
6. शाश्वत शेतीस चालना मिळते :
मित्रांनो शाश्वत (Sustainable) शेती म्हणजे काय? ही अशी शेती असते जी आज शेतकऱ्याचे पोट भरते आणि भविष्यातही जमिनीत तितकीच ताकद राखून ठेवते. शेतकरी मित्रांनो सेंद्रिय शेती हीच खरी शाश्वत शेती आहे कारण ती माती, पाणी, हवा आणि उत्पादन यांचं संतुलन जपते. आणि दीर्घकाळा साठी जमिनीत आवश्यक असे घटक जपून ठेवते.
मातीची ताकद दीर्घकाळ टिकते:
शेतकरी मित्रांनो रासायनिक शेतीमध्ये वापरले जाणारे खतं, कीटकनाशकं जमिनीला थकवतात. काही वर्षांत माती निर्जीव होते. तिची पोत, जीवसृष्टी आणि ओल टिकत नाही. म्हणून रासायनिक शेती मुळे शेतकरी कर्ज बाजारी होतो. शेतकरी मित्रांनो सेंद्रिय शेती मध्ये मातीला नैसर्गिक अन्न मिळतं (गांडूळ खत, शेणखत) तसेच मातीतील सूक्ष्मजीव जिवंत राहतात. सेंद्रिय घटक वाढतात, जे मातीला सुपीक ठेवतात.
पाण्याचे स्रोत टिकून राहतात
सेंद्रिय शेतीत पाण्याचा वापर कमी होतो आणि पाण्याचे प्रदूषण होत नाही तसेच भूगर्भातील पाण्याची पातळी राखली जाते. ही सगळी तत्त्वं जलसंपदा शाश्वत ठेवतात, जी शेतीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

निसर्ग साखळी वाचवली जाते:
सेंद्रिय शेतीमुळे:
- मधमाशी, गांडूळ, कीटकांचे नैसर्गिक संतुलन टिकते
- जैवविविधता (Biodiversity) जपली जाते
- पक्षी, प्राणी, झाडं यांना सुरक्षित निवास उपलब्ध राहतो
Organic Farming ही सगळी निसर्गसाखळी शेती टिकवण्यास मदत करते.
7. ग्राहकांना विषमुक्त अन्न मिळते (Good for health):
शेतकरी मित्रांनो आजकाल ग्राहकांच्या मनात नेहमी एक प्रश्न येतो की आपण जे खातोय, ते खरंच सुरक्षित आहे का?मित्रांनो रासायनिक शेतीत तयार होणारं अन्न हे अनेकदा कीटकनाशकांचे अवशेष, रासायनिक खतांचे अंश, आणि प्रक्रियेमधील कृत्रिम पदार्थ यांनी भरलेलं असतं. हे सर्व शरीरात साचल्यास अनेक प्रकारचे आजार, त्वचेच्या समस्या, पचनाच्या तक्रारी, अगदी काही वेळा कर्करोगासारखे गंभीर धोके निर्माण होऊ शकतात. याउलट, Organic Farming सेंद्रिय शेतीत उत्पादन घेतलेलं अन्न पूर्णतः नैसर्गिक असतं. यात कोणत्याही प्रकारचे हानिकारक रसायन, सिंथेटिक फवारणी किंवा GM (Genetically Modified) बियाणं वापरलं जात नाही. सेंद्रिय उत्पादनं:
- पूर्णपणे विषमुक्त
- पोष्टिक आणि ताजं
- नैसर्गिक चव आणि सुगंध असलेली
- अशा स्वरूपाची असतात.
उदाहरण: Organic Farming सेंद्रिय भाजीपाला आणि फळं अधिक काळ ताजं राहतात, आणि त्यांची चव पारंपरिक उत्पादनांपेक्षा अधिक नैसर्गिक असते. कारण ते कृत्रिम फवारण्यांपासून दूर असतात. शरीराला योग्य पोषणमूल्य मिळाल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते, आणि शरीर व मन दोन्ही तंदुरुस्त राहतात. त्यामुळे सेंद्रिय अन्न ही केवळ आरोग्याची निवड नाही, ती आयुष्यात सकारात्मक बदल घडवणारी निवड ठरते. मित्रांनो याशिवाय सेंद्रिय उत्पादन खरेदी करून ग्राहक शेतकऱ्याला थेट पाठिंबा देतो आणि पर्यावरणपूरक पद्धतींना प्रोत्साहन देतो हे समाजाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतं.
8. वेगवेगळ्या प्रजातीचे संरक्षण होते (Protection of Biodiversity):
शेतकरी मित्रांनो Organic Farming सेंद्रिय शेती ही केवळ माणसांसाठी फायदेशीर नसून तर ती निसर्गातील प्रत्येक सजीवाच्या जिवंत आधार देणारी शेती पद्धत आहे. जैवविविधता म्हणजे विविध प्रकारचे जीव जसे की गांडूळ, मधमाशी, भुंगे, कीटक, पक्षी, सूक्ष्मजंतू, वनस्पती, झुडपं हे सगळे मिळून शेतीचा एक सजीव परिसंस्था तयार करतात. रासायनिक शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांमुळे ही परिसंस्था हळूहळू नष्ट होत जाते. अनेक उपयुक्त कीटक आणि जंतू यांचा नाश होतो, त्यामुळे निसर्गाचे नैसर्गिक संतुलन ढासळते.
सेंद्रिय शेतीमध्ये ही जैवविविधता जपली जाते आणि फुलवली जाते. मातीतील गांडूळ, नायट्रोजन स्थिर करणारे जंतू, परागीकरण करणाऱ्या मधमाश्या हे सगळे Organic Farming सेंद्रिय शेतीत नैसर्गिकरित्या वाढतात. झाडांच्या आजूबाजूला विविध प्रकारची झाडं लावल्यामुळे कीटकांना सुरक्षित अधिवास मिळतो, आणि नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती वाढते. हे फक्त पर्यावरणासाठीच नव्हे तर शेतकऱ्याच्या उत्पादनासाठी सुद्धा फायदेशीर ठरतं — कारण कीटकांवर नियंत्रण आणि परागीकरण ही दोन्ही कामं निसर्गच स्वयंपूर्णपणे करत असतो. सेंद्रिय शेतीमुळे निसर्ग एकमेकांना मदत करतो आणि शेती दीर्घकाळ मजबूत, शक्तिशाली आणि टिकाऊ राहते.
9. शेतकरी स्वतःच्या जोरावर काम करतो (farmer works independently)
शेतकरी बंधुनो Organic Farming सेंद्रिय शेतीत शेतकरी बाह्य संसाधनांवर कमी अवलंबून राहतो आणि आपली शेती स्वतःच्या ज्ञान, अनुभव आणि स्थानिक स्रोतांच्या आधारे करतो. पारंपरिक रासायनिक शेतीमध्ये बियाणे, खते, फवारणी, सल्ला सगळं काही बाहेरून विकत घ्यावं लागतं. यामुळे शेतकरी कंपन्यांवर आणि बाजारभावांवर पूर्णपणे अवलंबून होतो. मात्र, सेंद्रिय शेतीत याच्या उलट स्वतःच्या जोराची खरी ताकद दिसून येते.
📌 शेतकरी स्वतःच गांडूळ खत, कंपोस्ट, निंबोळी अर्क, गोमूत्र वापरून जैविक फवारण्या तयार करू शकतो.
📌 पारंपरिक स्थानिक बियाणे जपून ठेवता येतात, जे हवामान आणि जमिनीसाठी अधिक योग्य असतात.
📌 शेतकरी मित्रांनो आपण आज सेंद्रिय शेतीसाठी अनेक सल्ला देणारे, प्रशिक्षण शिबिरे, YouTube चॅनल्स, वर्कशॉप्स उपलब्ध आहेत ज्यामुळे शेतकरी शिकून, करून आणि सुधारून पुढे जातो.
या सगळ्यामुळे शेतकरी केवळ उत्पादनकर्ता राहत नाही, तर दुसऱ्यावर अवलंबून न राहता, स्वतःच्या प्रयत्नांनी काम पूर्ण करतो. यातून मिळणारी आत्मनिर्भरता आणि समाधान हे कोणत्याही सबसिडीपेक्षा मोठं मूल्य आहे.
10. पर्यावरणासाठी फायदेशीर (Beneficial for the environment):
शेतकरी मित्रांनो Organic Farming सेंद्रिय शेती केवळ शेती करण्याची एक पद्धत नाही, ती भविष्यासाठी शेतकऱ्यांचा जगण्याचा मार्ग आहे. हवामान बदल, प्रदूषण, नैसर्गिक या सर्व गोष्टींचा समोर जाताना शेतीतूनही चांगले बदल घडवता येता आणि तो बदल सेंद्रिय शेती करू शकते.
रासायनिक शेतीमुळे मातीच, पाण्याचं प्रदूषण, किडकणशकांमुळे जैवविविधतेचा नाश, आणि शेवटी कार्बन उत्सर्जन वाढतो. याच्या उलट सेंद्रिय शेतीत:
- मातीची सेंद्रिय घटक वाढतात, जे कार्बन शोषून घेतात
- नैसर्गिक खतांचा वापर होतो, जे पाण्याचं प्रदूषण टाळतात
- फवारणी कमी असल्यामुळे हवेचा दर्जा सुधारतो
- जैवविविधता टिकते, निसर्गसाखळी मजबूत राहते
शेतकरी मित्रांनो यामुळे ग्लोबल वॉर्मिंगच्या विरुद्ध चांगल पाऊल टाकलं जातं. सेंद्रिय शेती ही शाश्वत विकासाचे (Sustainable Development) ध्येय पूर्ण करण्यासाठी एक प्रभावी साधन आहे. Organic Farming शेती ही केवळ अन्न उत्पादन नसून ती निसर्गाशी असलेली आपली नाळ आहे. सेंद्रिय शेती करताना शेतकरी आणि ग्राहक दोघंही मिळून एक हरित आणि सुरक्षित भविष्य घडवता येईल जे आपल्या पुढील पिढ्यांसाठी चांगले आणि नैसर्गिक असू सकते. शेतकरी बंधुनो आपण हे सेंद्रिय शेती चे फायदे बघितले माहिती कशी वाटली नक्की सांगा.
माहिती कसी वाटली आम्हाला नक्की सांगा
- इतर शेतकऱ्यांपर्यंत माहिती शेअर करा
- कमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारा
- नवीन माहितींसाठी आमच्या फेसबुकवर Agro Marathi ला फॉलो करा
Organic Farming साठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs):
( Organic Farming) सेंद्रिय शेती ही अशी शेती आहे जिथे कोणत्याही रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने अन्न उत्पादन केलं जातं. यामध्ये शेणखत, गांडूळखत, जैविक किटकनाशकांचा वापर होतो.
होय, कारण यामध्ये खर्च कमी असतो, उत्पन्न आरोग्यदायी असतं आणि बाजारात अशा उत्पादनांना चांगला दर मिळतो. दीर्घकाळासाठी जमिनीची सुपीकताही टिकून राहते.
प्रारंभी काही प्रमाणात कमी वाटू शकतं, पण जमिनीची सुधारलेली स्थिती आणि वाढलेली बाजार मागणी यामुळे दीर्घकालीन नफा निश्चित वाढतो.
रासायनिक खतांचा वापर न केल्याने उत्पादन विषमुक्त आणि पोषणमूल्यांनी भरलेलं असतं, जे शरीरासाठी अधिक सुरक्षित आणि आरोग्यदायी असतं.
कीटक नियंत्रण, बाजारपेठ मिळवणं आणि सुरुवातीच्या काळात उत्पादन थोडं कमी होणं ही काही सामान्य आव्हानं आहेत. पण योग्य माहिती आणि तंत्रज्ञान वापरल्यास ही आव्हानं सहज पार करता येतात.
आज अनेक शहरांमध्ये सेंद्रिय बाजारपेठा (organic markets), ऑनलाइन पोर्टल्स, थेट ग्राहक विक्री (Direct to Customer) हे पर्याय खुले झाले आहेत.
हो, भारत सरकार आणि राज्य सरकार सेंद्रिय शेतीसाठी अनुदान, प्रशिक्षण, आणि सेंद्रिय प्रमाणपत्र देण्यासाठी योजना चालवतात. PM-Paramparagat Krishi Vikas Yojana ही त्यातील एक प्रमुख योजना आहे.