🔹 परिचय
शेतकरी मित्रांनो आज आपण बघू केळी वर कीड मुळे किती नुकसान होते या साठी आज आपण Clothianidin 50% WG हे कश्या प्रकारे कीड नियंत्रण करते. केळी हे भारतातील सर्वाधिक लागवड केले जाणारे फळपीक आहे. मात्र, या पिकावर विविध किडींचा मोठा प्रादुर्भाव होतो. या मध्ये विशेषतः थ्रिप्स, अफिड्स, मिलीबग आणि बोरर या रसशोषक किडी केळीच्या वाढीवर आणि उत्पादनावर वाईट परिणाम करतात. अशा परिस्थितीत Clothianidin 50% WG हे एक अत्यंत प्रभावी रासायनिक कीटकनाशक ठरते. Clothianidin 50% WG हे आपण केळी साठीच नाही तर इतर पिकांवर पण वापरुन कीड नियंत्रण करू सकतो. Clothianidin 50% WG हे किडकनाशक शेतकरी फक्त फवारणी मधून नाही तर आपण जमिनीतून सुद्धा देऊ सकतो. जर केळी ला खोड किडा लागलेला असेल तर आपण Clothianidin 50% WG हे किडनाशक ड्रीप मद्धामातुन सुद्धा देऊ सकतो. आज आपण बघू Clothianidin 50% WG कस आणि केव्हा फावरणी करू सकतो
Clothianidin 50% WG म्हणजे Clothianidin नावाचे औषध जे ५०% प्रमाणात पाण्यात विरघळणाऱ्या ग्रॅन्यूल्समध्ये आहे.
शेतकरी मित्रांनो Clothianidin हे Neonicotinoid वर्गातील कीटकनाशक आहे. आणि याचा प्रभाव कीटकांच्या सेंट्रल नर्वस सिस्टिम वर होतो. यामुळे कीटकांच्या खाण्याच्या व हालचालीच्या क्रिया थांबतात आणि काही तासांतच त्यांचा नाश होतो. हे किडकनाशक खूप प्रभावी आहे याचा योग्य वापर लवकर कीड थांबून पिकच स्वरक्षण करू सकतो म्हणून शेतकऱ्यांनी योग्य वेळी दखल घेऊन हे वापरव. हे आपण आज या लेखात बघणार आहोत. ते खालील प्रमाणे
🔹 केळीवरील कीड नियंत्रणात Clothianidin 50% WG चे काय फायदे आहे.
- रसशोषक किडींवर नियंत्रण: अफिड्स, जॅसिड्स, थ्रिप्स, व्हाइटफ्लाय इत्यादींवर उत्कृष्ट प्रभाव.
- दीर्घकालीन संरक्षण: एकदाच फवारणी केल्यावर 15 ते 20 दिवस कीड नियंत्रण मिळते.
- सिस्टमिक कृती: मुळांद्वारे संपूर्ण झाडात फैलते, त्यामुळे संपूर्ण झाड संरक्षित होते.
- जलद परिणाम: फवारणीनंतर काही तासांतच कीड निष्क्रिय होते.
- फळ व पानांचे रक्षण: पानांचा पिवळेपणा व फळावरील डाग टाळतो.
🔹 वापरण्याची मात्रा आणि पद्धत
| फवारणी | प्रति 200 लिटर पाण्यात 40 ग्रॅम | समसमान फवारणी करावी |
| जमिनीतून देणे (ड्रेंचिंग) | प्रति झाड 1 ग्रॅम औषध पाण्यात मिसळून | रोपांच्या मुळांजवळ वापरावे |
👉 सावधान: फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी शांत वातावरणात करावी.
👉 फळांच्या काढणीनंतर किमान 15 दिवसांनंतरच औषध वापरावे.
🔹 Clothianidin 50% WG केव्हा वापरावे ?
हे किडकनाशक केव्हा वापरावे याची खात्री करून घ्या कारण Clothianidin 50% WG हे खूप प्रभावी किडकनाशक आहे.
- थ्रिप्स, अफिड्स किंवा मिलीबगचा प्रादुर्भाव दिसल्यास त्वरित Clothianidin वापरावे.
- फुलोऱ्याच्या आधी किंवा फळ सेटिंगच्या टप्प्यात वापरल्यास अधिक फायदा होतो.
🔹 शेतकऱ्यांनी Clothianidin वापरताना कोणती काळजी घ्यावी
- शेतकरी बांधवांनी हातमोजे, मास्क, चष्मा वापरावा.
- वारा असताना फवारणी टाळावी.
- इतर कीटकनाशकांबरोबर मिसळताना सल्ला घ्यावा.
- औषध पाण्याच्या स्त्रोताजवळ ठेवू नये.
- मुले व प्राणी यापासून लांब ठेवावे.
🔹 Clothianidin 50% WG उपलब्ध ब्रँड्स
यात काही ब्रॅंडस आहे शेतकरी हे सुद्धा घेऊ सकता. ब्रॅंडस खालील प्रमाणे
- Dantotsu 50 WG (Sumitomo Chemical)
- Clothio 50 WG
- Cortex 50 WG
- NeoGuard 50 WG
- Danzhi 50 WG ( Agrostar )
हे सर्व ब्रँड केळी, ऊस, कापूस आणि भात पिकावर देखील वापरले जातात.
🔹 कीड नियंत्रणासाठी एकत्र वापरता येणारी रासायनिक औषध
शेतकरी यात काही रासायनिक औषध वापरू सकता खाली काही औषध सुचवले आहेत
- Imidacloprid 17.8% SL – सुरुवातीच्या कीडीसाठी
- Thiamethoxam 25% WG – पर्यायी सिस्टमिक औषध
- Lambda Cyhalothrin 5% EC – चावणाऱ्या किडींसाठी
- Buprofezin 25% SC – मिलीबग नियंत्रणासाठी
टीप : हे वापरत असतांना कृषि सल्ला घेऊन वापरा .
🔹 Clothianidin चा परिणाम दिसायला लागण्याचा कालावधी
शेतकऱ्यांनी लक्षात घ्याव फवारणी केल्यानंतर 6 ते 8 तासांत कीटकांची हालचाल थांबते, आणि 24 तासांत मृत्यू होतो.
हे औषध पान, खोड व मुळांमध्ये टिकून राहत असल्याने पुढील 15–20 दिवस नवीन कीड होण्यापासून संरक्षण मिळते.
🔹 Clothianidin वापरल्याने मिळणारे काय आर्थिक फायदे
- उत्पादनात 15%–25% वाढ
- फळांची गुणवत्ता सुधारते
- कीडमुळे होणारा खर्च कमी
- दीर्घकालीन संरक्षणामुळे फवारणीचे वारंवारतेत बचत
🔹 निष्कर्ष
शेतकरी मित्रांनो Clothianidin 50% WG हे केळीवरील रसशोषक आणि चावणाऱ्या किडींवर अत्यंत प्रभावी रासायनिक औषध आहे. योग्य प्रमाणात व योग्य वेळी वापरल्यास हे औषध केळीचे उत्पादन, गुणवत्ता आणि नफा दोन्ही वाढवते.
केळी शेतकऱ्यांसाठी हे एक विश्वासार्ह रासायनिक संरक्षण उपाय आहे. हे वापरुन नक्कीच आपला फायदा होईल पुढून माहिती कोणत्या विषयावर हवी आहे कमेन्ट मध्ये सांगा.
माहिती कसी वाटली नक्की सांगा
अजून या बद्दल माहिती हवी असल्यास कमेन्ट मध्ये विचार
माहिती आपल्या शेतकरी मित्रांना Share करायला विसरू नका.
आणि अश्या माहिती साठी आम्हाला Youtube, Facebook, ला फॉलो करायला विसरू नका.
धन्यवाद
🔹 FAQ (वारंवार विचारले जाणारे प्रश्न)
उत्तर : थ्रिप्स, अफिड्स, मिलीबग आणि व्हाइटफ्लाय नियंत्रणासाठी.
उत्तर : 6साधारण –8 तासांत कीड निष्क्रिय होते.
उत्तर : नाही, हे पूर्णपणे रासायनिक कीटकनाशक आहे
उत्तर : सुमारे 15–20 दिवस कीड नियंत्रण मिळते.
उत्तर : Thiamethoxam, Imidacloprid ही औषधे पर्यायी म्हणून वापरता येतात.









